कोल्हापूरात चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस, करवीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस

619

कोल्हापूरात बुधवारी सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस बरसला. संपूर्ण जिल्हा गारठुन गेला असुन, दिवसभर ढगाळ वातावरण तसेच पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात करवीर  सर्वाधिक 98.36 तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 10.14 मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी 

हातकणंगले-20 (एकूण 179.20), शिरोळ- 10.14 (98.31),पन्हाळा-66(212.79), शाहूवाडी-73(206.03), राधानगरी-49.83 (74.98), गगनबावडा-59.50 (55.61), करवीर- 98.36(535.38), कागल-63.29 (497.88), गडहिंग्लज-49.14(215.98), भुदरगड-66.20 (194.82),आजरा-80.25(205.71) आणि  चंदगड-74.59 (131.16) मिमी अशी नोंद झाली आहे.

दरम्यान राधानगरी धरणात सध्या 39 दलघमी पाणीसाठा आहे. तर बुधवारी सकाळी 7 च्या अहवालानुसार कोयना धरणातून 2100  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

आपली प्रतिक्रिया द्या