
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मंदसौर जिल्ह्यात पावासामुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. तर चंचौडा नदी पार करताना एक तरुण पाण्यात वाहून गेला. भोपाळमध्येही पाऊस विश्रांती घेऊन कोसळत आहे. त्यामुळे लोकांनी बाहेर न पडणे पसंत केले आहे.
मध्य प्रदेशमध्ये पावसाचा सर्वाधिक फटका मंदसौर जिल्ह्याला बसला आहे. अनेक कच्ची गरे उध्वस्त झाली आहे. मंदसौर जिल्ह्याच्या प्रशासाने विस्थापित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या जेवण्याची सोय केली आहे. तसेच पीडितांना नुकसान भरपाई देण्याचेही आश्वासन दिले आहे.
बैतुल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील नदीला पूर आल्याने बैतुल- अबोदुल्लागंज महामार्ग अनेक तास ठप्प होता. आताही महामार्गावरून पाणी वाहत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पाऊस असाच कोसळत राहिल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.




























































