मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

1287

मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. आता हवामान खात्याने मुंबई आणि परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात मेघगर्जनसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी अतिमूसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अतिमूसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात 204.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, उपनगर आणि ठाण्यात मंगळवारी आणि बुधवारी मूसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिमूसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीतही येत्या दोन दिवसात काही ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यातील काही भागात जोरदार सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या