
सामना ऑनलाईन । नगर
नगर शहरामध्ये शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. याचबरोबर अनेक ठिकाणी अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती.
पावसामुळे कापड बाजार रोड नालेगावसह शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. जोरदार पावसाने सुरुवात केल्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली शहरासह उपनगरांमध्ये सुद्धा हा पाऊस सुरू होता. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणचे पत्रेदेखील उडून गेले होते. अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली होती.
































































