रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपायला सुरूवात केली आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. कालपासून जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुढील 24 तास पावसाचा ज़ोर रहाणार आहे.

मॉन्सूनने जिल्ह्यात आता चांगलाच जम बसवला आहे. मंगळवारी सायंकाळी संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढल्या नंतर आज पुन्हा सकाळी रत्नागिरीसह अन्य काही तालुक्यांना झोडपायला सुरूवात केली.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 51 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात पडला असून 147 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राजापूरात 82 मिमी,चिपळूणात 62 मिमी पाऊस पडला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. रस्त्याशेजारची गटारे तुडूंब भरून वहात होती. गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना पाण्यातून कसरत करावी लागत होती.