कुर्ला ते दादर परिसरात पाणी साचल्याने लोकल विस्कळीत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लटकले

523
water-on-track-thane-station
प्रातिनिधीक

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेसाठी चालकिण्यात येणार्‍या लोकलसेवांना सोमवार रात्रीपासूनच सुरू असलेल्या जोरदार पावसाने जोरदार फटका बसला. कुर्ला ते दादर परिसरात ट्रकवर पाणी तुंबल्याने मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही सेवा विस्कळीत झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या कर्मचार्‍यांना ट्रॅकवरून चालत जात नजिकचे स्थानक गाठून आपला पुढील प्रवास टॅक्सी आणि बेस्टच्या बसेसद्वारे करावा लागला.

हवामान खात्याने दिलेल्या जोरदार पावसाच्या इशार्‍यानंतर मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मंगळवारी सकाळी वडाळा आणि परळ परिसरात पाणी साचून मध्य आणि हार्बर सेवा ठप्प झाली. सकाळच्या पिकअवरमध्ये वाशी आणि पनवेल तसेच ठाणे आणि कल्याणच्या पुढे शटल सेवा चालविण्यात येत होत्या, तर लांबपल्ल्यांच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. दादर आणि प्रभादेवीमध्ये ट्रॅकवर 200 एमएम पाणी साचल्याने  पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते दादर वाहतुक बंद करण्यात आली. वांद्रे आणि डहाणू दरम्यानची वाहतूक मात्र सुरू ठेवण्यात आली. दुपारी साडे बारानंतर पाणी ओसरू लागल्याने चर्चगेटवरून पहिली डाऊन धिमी लोकल दुपारी 12.05 वाजता सोडण्यात आली. तर अप धिमी लोकल अंधेरीहून सकाळी 11.40 वाजता सोडण्यात आली. तर चर्चगेटहून डाऊन जलद मार्गाची वाहतूक दुपारी 1.10 वाजता सुरू करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या