नेपाळमध्ये पावसाचा कहर, 28 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । काठमांडू

नेपाळमध्ये पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 16 जण बेपत्ता झाले आहेत. नेपाळमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागात पूर आला असून दरड कोसळल्या आहेत. तसेच अनेक महामार्ग पावसामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक नद्यांचे तट तुटले असून जवळच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे.

नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देशात नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. तसेच 16 जण बेपत्ता झाले आहेत. या मुसळधार पावासाच्या दरम्यान पूरग्रस्त भागात अन्न आणि गरजोपयोगी सामान पोहोचवले जात आहे.  गृह मंत्रालयाने माहिती दिले की बचाव कार्यात सुरू आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल सहा हजार लोकांना फटका बसला आहे.