
एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याने सावधगिरीचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून ‘एनडीआरएफ’च्या तीन टीम मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मुसळधार पावसाच्या इशाऱयामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वे ठप्प झाली होती. मात्र शुक्रवारी दुपारनंतर आणि शनिवारी दिवसभरही पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईत जनजीवन सुरळीत सुरू होते. मात्र मुंबईच्या काही भागांत जोरदार सरी बरसल्या. यामध्ये मुंबईत एकूण पाच ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. तर 6 ठिकाणी शॉर्टसर्किट तर 13 ठिकाणी झाड-झाडाच्या फांद्या कोसळल्याचा घटना घडल्या. या तुरळक घटना वगळता मुंबईचे जनजीवन रेल्वे, बस आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
असा झाला पाऊस
मुंबई शहर – 33.79 मिमी
पूर्व उपनगर – 56.26 मिमी
पश्चिम उपनगर – 52.33 मिमी































































