
सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम
केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून तुफान पाऊस आणि भूस्खलनामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्की भागात भूस्खलनामुळे १०, मलप्पुरममध्ये ५, कन्नूरमध्ये २ आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच वायनाड, पलक्कड आणि कोझिकोड जिल्ह्यातून काही व्यक्त बेपत्ता असल्याचेही समोर आले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.
#Kerala: All passenger carrying trains on Kanjikode-Walayar stretch in the Palakkad-Podanur section are likely to be regulated by 30 minutes to 60 minutes. Freight trains to be delayed. Repair work of the damaged track expected to be completed today. pic.twitter.com/FrFLkMPqwg
— ANI (@ANI) August 9, 2018
एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
मुसळधार पाऊसामुळे नदी, नाले तुडुंब भरले असून अनेक भागात पाणी साचले आहे. इडुक्की जिल्ह्यातील अडीमाली शहरात पावसामुळे धुमाकूळ घातला असून एकाच कुटुंबातील पाच जणांचा घर कोसळून मृत्यू झाला आहे. बचाव पथक, पोलीस आणि स्थानिकांना दोन जणांना ढिगाऱ्याखालून जीवंत बाहेर काढण्यात यश आले. पावसामुळे इडुक्की डॅम पूर्ण भरला असून तब्बल २६ वर्षानंतर यातून पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सकाळीही ६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
#WATCH Kerala Fire & Rescue Department rescue people from low-lying residential areas using boats as rain water enters houses in Pathalam, Ernakulam. #Kerala pic.twitter.com/TnnmPItU9T
— ANI (@ANI) August 9, 2018
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
केरळमध्ये पावसामुळे उड़ालेल्या हाहाकाराचा मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आढावा घेतला आहे. ‘बचावासाठी आम्ही लष्कर, नौदल, कोस्टगार्ड आणि एनडीआरफची मदत मागवली आहे. एनडीआरएफचे तीन बचाव पथक येथे पोहोचलेही आहेत, तर अन्य २ पथक लवकरत पोहोचतील. आम्ही सहा पथकांची मागणी केली होती. पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे नेहरू ट्रॉफी बोट रेस स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे,’ असे पिनाराई यांनी सांगितले.
We have sought help from the Army, Navy, Coast Guard & NDRF. 3 NDRF teams have arrived, 2 teams to arrive soon and 6 additional NDRF teams have been called in. Nehru Trophy Boat Race has been cancelled: Kerala CM Pinarayi Vijayan pic.twitter.com/HL0fV8PZRV
— ANI (@ANI) August 9, 2018
मलप्पुरम मध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता खचला, त्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली आहे.
#WATCH: Road gets washed out in Malappuram after flash flood hit the region. #Kerala pic.twitter.com/2CqWjkn0no
— ANI (@ANI) August 9, 2018



























































