गणेश मंदीर टेकडी ट्रस्टचा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश

584

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी श्री गणेश मंदीर टेकडी ट्रस्ट नागपूरच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 लाख रुपये निधीचा धनादेश रविवारी रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.यावेळी श्री गणेश मंदीर टेकडी ट्रस्टचे सचिव श्रीराम कुलकर्णी, विश्वस्त शांतीकुमार शर्मा, दिलीप शहाकार, अरूण व्यास, माजी सचिव अरूण कुलकर्णी उपस्थित होते.

 दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीही मदत

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गडचिरोलीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश रविवारी रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार कृष्णा गजभिये, दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या