सोप्या गोष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोप्या गोष्टी

  • काजू आणि इतर सुकामेव्याला कीड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लवंगा घालून ठेवा.
  • कारल्याची भाजी करताना तिचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवा.
  • स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. स्वच्छ होतील.
  • हातांची त्वचा स्वच्छ आणि नरम राहावी यासाठी चमचाभर गोडेतेलात साखर मिसळून हातावर मसाज करा आणि नंतर हात धुवा.
  • पोट बिघडल्यावर आले, लिंबाचा रस एकत्र करून त्यात थोडं मीठ टाकून प्या. बरे वाटेल.
  • घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने पंखा पुसा.
  • भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना त्यासोबत कोरडा स्पंजचा तुकडा ठेवा. दोन-तीन दिवसांनंतर स्पंजचा तुकडा पिळा आणि त्यातील पाणी निघून गेल्यानंतर पुन्हा भाजीच्या डब्यात ठेवा.
  • कपडय़ाला लागलेले तेलाचे डाग जाण्यासाठी त्या डागांवर पेट्रोल चोळा नंतर ते कापड स्वच्छ धुवा.
  • डोश्याचे पीठ तव्याला चिकटू नये यासाठी वांगे किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर फिरवा.