
सामना ऑनलाईन । मुंबई
‘हेमंत करकरेंनी साध्वी प्रज्ञा यांचा छळ केला. त्यांनी अशा प्रकारे लोकांचा छळ करून चूक केली’, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. तसेच प्रज्ञा सिंह यांनी करेकरेंबद्दल केलेले वक्तव्य मागे घेतले हा त्यांचा मोठेपणाच असल्याचे देखील कुमार यांनी म्हटले आहे.
Indresh Kumar, RSS, in Bhopal: Hemant Karkare (former Maharashtra ATS chief) died of terrorist’s bullets, so he is a martyr & deserves respect. However, then Congress Govt misused agencies & tortured a woman(Bhopal MP Pragya Thakur) under conspiracy of ‘bhagwa aatankwad’. (31.07) pic.twitter.com/2MMsFAgRTC
— ANI (@ANI) July 31, 2019
Indresh Kumar, RSS: Hemant Karkare acted wrongly by torturing others. Still, Pragya exhibited humanity by amending her statement (on Karkare) after there was uproar over her remarks https://t.co/sCslZlxoCe
— ANI (@ANI) July 31, 2019
‘हेमंत करकरे हे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहदी झाले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रति आदर आहे. मात्र त्यावेळी काँग्रेसने या संस्थांचा गैरवापर करत एका महिलेचा छळ केला. ‘भगवा दहशतवाद’च्या नावाखाली हा कट रचला गेला. हेमंत करकरे यांनी लोकांचा असा छळ करून चूक केली आहे. तरी देखील साध्वी प्रज्ञा यांनी त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य मागे घेत त्यांचा मोठेपणा दाखवून दिला आहे’, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे.


























































