पोटगी प्रकरण, हेमंत नगराळे यांची याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार महिन्यांपासून पोटगी थकवली आहे, अशी याचिका मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. ती रद्द करावी, अशी याचिका नगराळे यांनी दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नगराळे यांची याचिका फेटाळली आहे.

नगराळे यांचा 2011 साली घटस्फोट झाला. त्यावेळी कुटुंब न्यायालयाने त्यांच्या पत्नीला दरमहा 20 हजार पोटगी मंजूर केली तसेच या पोटगीमध्ये वाढ करण्याची मागणीही पत्नीने केली. मात्र, नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे तसेच नगराळे यांच्याकडून असे पहिल्यांदा होत नसल्याचेही त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. पत्नीचा हा न्यायालयातला अर्ज रद्द करण्याची मागणी नगराळे यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नगराळे यांची मागणी फेटाळली.