
‘घराला घरपण मिळवून देणारी माणसं’ अशी जाहिरात करून हजारो ग्राहकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डीएसकेंना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी डीएसके ऊर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला. मात्र डीएसपेंच्या पत्नी हेमंती यांना जामीन दिला.
जास्त पैशाचे आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना 2 हजार 43 कोटींना फसवले. याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यांना अटकही झाली. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून डीएसके व त्यांची पत्नी हेमंती यांनी अॅड. आशुतोष श्रीवास्तवा आणि अॅड. रीतेश येवलेकर यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

























































