अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरीनात हाऊसफुल्लचा बोर्ड झळकणार

38

सामना ऑनलाईन, मुंबई

अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरीना हे स्टेडियम हिंदुस्थानी फुटबॉल संघासाठी ‘लकी’ ठरत असून आता येत्या १ जूनपासून याच स्टेडियममध्ये हीरो इंटरकॉण्टिनेण्टल चौरंगी फुटबॉल स्पर्धेचा थरार तमाम मुंबईकर क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान, चीन तैपेई, केनिया व न्यूझीलंड या देशांचा सहभाग असून यूएईमध्ये होणाऱया एएफसी आशियाई स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून याकडे बघितले जात आहे. १ ते १० जून या कालावधीत खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेच्या लढती हाऊसफुल्ल होण्याची शक्यता असल्यामुळे स्टेडियमबाहेरही याचे बोर्ड झळकतील असे संकेत मिळाले आहेत.

हिंदुस्थान व चीन तैपेई यांच्यामध्ये शुक्रवारी सलामीची लढत होणार असून या लढतीची फुटबॉलप्रेमी चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. या लढतीचा आनंद फुटबॉलप्रेमींना अवघ्या २५० रुपयांत घेता येणार आहे. तसेच ४९९ रुपयांचीही तिकिटे या स्पर्धेतील लढतींसाठी ठेवण्यात आलेली आहेत. १० जूनला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या