लेहमध्ये अभियंत्याकडून हेरॉईन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेह येथे खासगी विमान कंपनीच्या एका विमान देखभाल अभियंत्याला हेरॉईनसह अटक करण्यात आली. अजय ठाकूर (22) असे त्याचे नाव असून तो हिमाचल प्रदेशातील मंडी जिह्याचा रहिवासी आहे. या घटनेमुळे विमानतळावरील कर्मचारी आणि अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांमधील संभाव्य संबंधाचा तपास सुरू झाला आहे. अजय ठाकूर हा खासगी कारमधून प्रवास करत असताना नियमित गस्त घालणाऱ्या एएनटीएफच्या पथकाने त्याला अडवले. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडून 2.27 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आली.