अग्निशमन दलात आल्या ‘हायटेक फायर बाईक्स’, गल्लीबोळात शिरणार, आग विझवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या अग्निशमन दलात बारा हायटेक बाईक्स दाखल झाल्या आहेत. ज्या ठिकाणी मोठमोठे फायर इंजिन-बंब पोहचू शकत नाही अशा दाटीवाटीच्या वस्ती, चाळी-गल्लीबोळात या फायर बाईक वेगाने पोहचू शकणार आहेत. त्यामुळे दुर्घटनेत बचाव कार्य लवकर सुरू होणार असून जीवित-वित्तहानी टाळण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकरी हेमंत परब यांनी दिली.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत वेगाने औद्योगिक आणि नागरी किकास होत असून दाटीवाटीची वस्तीही वाढत आहे. त्यामुळे अशा दाटीवाटीच्या ठिकाणी आगीसारख्या दुर्घटना घडल्यास पालिकेच्या अग्निशमन दलाला पोहोचण्यास मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढून जीवित-वित्तहानीचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीकर दाटीकाटीच्या ठिकाणी आकश्यक साधन सामग्रीसह पोहोचून बचाक कार्य करणाऱया फायर बाईक्स मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आणल्या गेल्या  असल्याची माहिती अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी दिली. दरम्यान, या एका बाईकसाठी सुमारे 13 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

 अशा आहेत फायर बाईक्स, असा आहे फायदा

  • या बाईक्सकर दोन्ही बाजूला पाण्याच्या छोटय़ा टाक्या असतील. एकूण 30 लिटर पाणी नेता येईल.
  • गाडीकरच पाण्याची सोय असल्यामुळे अडगळीच्या ठिकाणी पाठीवरून पंप नेण्याची गरज भासणार नाही.
  • अग्निशमन दलाचे दोन जवान या बाईककरून जाऊ शकणार आहेत.
  • याशिकाय इनबिल्ट इंजिनमुळे घटनास्थळी असणाऱया पाण्याच्या टाक्यांमधून पाणी खेचून फवारा करता येणार आहे.
  • बाईकवर सायरन, वायरलेस संपर्क यंत्रणा आणि मिनिटाला 8 लिटर पाण्याचा फवारा करू शकणारी यंत्रणा राहील.