अपंगांसाठी व्यावसायिक इमारतींत रॅम्प आहेत का? हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना विचारणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

व्यावसायिक इमारतीत विकलांगाना रॅम्प अथवा सरकते जिने उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी अडचण होते. ही अडचण टाळण्यासाठीच 15 पैकी 8 व्यावसायिक आस्थापनांमध्ये हे रॅम्प बसवण्यात आले आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली. न्यायालयाने याची दखल घेत याचिका कर्त्यांनी प्रत्यक्ष हे रॅम्प जाऊन तपासावेत असे आदेश दिले

व्यावसायिक आस्थापना मध्ये जाताना अपंग तसेच विकलांग व्यक्तींची गैरसोय होत असल्याने इंटेरिअर डिझाइनर निशा जामवाल आणि ऍड. आभा सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली त्यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईतील आयनॉक्स, स्टार्लिंग , रिगल सिनेमा तसेच पेनिन्सुला बिझनेस पार्क, जेड गार्डन, तुलसीयानी चेंबर्स, नँशनल गॅलरी, आयनॉक्स अट्रीया, तमाशा पब, फोर सीझन आणि ओबेरॉय हॉटेल व मुंबई पुणे महामार्गावरील फूड कोर्ट आणि मेकंडोनाल्ड येथे रॅम्प आणि सरकते जिने उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली त्यापैकी मुंबई पुणे महामार्गावरील फूड कोर्ट आणि मेकंडोनाल्ड हे पालिकेच्या अखत्यारीत येत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच काही ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती ही प्रशासनाने दिली.

तीव्र उतारामुळे गैरसोय
सुनावणीवेळी पालिका प्रशासनाच्या वतीने थ्री डी छायाचित्रे दाखवली ही छायाचित्रे पाहून न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. काही रॅम्पची अशा प्रकारे निर्मिती करण्यात आली आहे की तीव्र चढावामुळे त्यावर एखादा अपंग व्यक्ती स्वतःहून व्हीलचेअर नेऊ शकत नसल्याचे न्यायमूर्तींनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले एवढेच नव्हे तर याप्रकरणी खडे बोल ही पालिकेला सुनावत सुनावणी तहकूब केली.