
मशीद व मदरशाची खोटी माहिती देणे विश्वस्तांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या विश्वस्तांविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच त्यांना अडीच लाखांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.
गोरेगाव येथील अमन शांती एसआरए प्रकल्पात मशीद व मदरशाची जागा आहे. याचे विश्वस्त मोहम्मद फारुन अन्सारी, मोहम्मद अयुब मुरशाद, अतिकुर रहेमान अन्सारी व इसराफिल अन्सारी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्या. कमल खाथा यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. या विश्वस्तांनी खरी माहिती लपवून न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असा दावा हा एसआरए प्रकल्प राबवणाऱया इंदू कन्स्ट्रक्शनने केला. त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने विश्वस्तांना चांगलाच दणका दिला.