
कराराचे उल्लंघन केल्याने चित्रपट निर्मात्यांविरोधात हायकोर्टात धाव घेणाऱया पीव्हीआर, आयनॉक्सला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ‘भूल चूक माफ’ चित्रपटाच्या 16 मे रोजी होणाऱया ओटीटी प्रदर्शनाला हायकोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे.
अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेला ‘भूल चूक माफ’ 9 मे रोजी पीव्हीआर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास निर्मात्यांनी होकार दर्शवला होता, मात्र हा करार रद्द करण्यात आला व निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पीव्हीआरने हायकोर्टात आव्हान दिले व ओटीटी प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली. या याचिकेवर न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने पीव्हीआरला दिलासा देत चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला स्थगिती दिली.




























































