मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण; सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह सर्व आरोपींचा जामीन अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यातमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

24 जून 2017 रोजी मंजुळा शेट्ये हिला भायखळा तुरुंगातील महिला कारागृह रक्षकांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली होती. या मारहाणीत मंजुळा शेट्ये हिचा मृत्यू झाला. तुरुंगातील अन्य महिला कैद्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांना अटक केली होती. सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.