नवाब मलिकांकडून बदनामी; वानखेडेंची याचिका फेटाळली

सोशल मीडिया तसेच मुलाखतीच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी बदनामी केल्याचा दावा करत हायकोर्टात धाव घेणाऱ्या एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांना हायकोर्टाने आज दिलासा देण्यास नकार दिला. वानखेडे यांनी केलेल्या दाव्यावर आम्ही समाधानी नाही तसेच नवाब मलिक यांनी न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसत नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठाने वानखेडे यांची याचिका फेटाळली.