आंगणेवाडीत दोन हायमास्ट टॉवर उभारणी; जिओ मोबाईल टॉवरही लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवणातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेच्या तयारीसाठी आंगणेवाडी मंडळासोबत शासन यंत्रणाही सज्ज झाले आहे. आंगणेवाडी परिसर अधिक प्रकाशमान व्हावा यासाठी नव्याने दोन हायमास्ट टॉवर मंजूर करण्यात आले असून त्यांची उभारणी सुरू झाली आहे.

आंगणेवाडीत मोबाईल रेंजची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. याचा विचार करता असलेल्या टॉवरची क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच येथील शाळांमध्ये सुसज्ज शौचालय उभारण्यात येणार आहेत. त्याचा वापर यात्रेदरम्यान करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाही केली जाणार आहे. मागील आठवड्यात कणकवली येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित झालेल्या आढावा बैठकीत सुचवलेली अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आंगणेवाडी येथे आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, पालिका बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी, तृप्ती मयेकर, शिल्पा खोत, नरेश हुले, मंदार ओरसकर, महेश मेस्त्री व अन्य उपस्थित होते.