माहीम-माटुंग्यात सर्वाधिक घरांची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरखरेदीसाठी मुंबईतील माहीम-माटुंगा ही सर्वाधिक पसंतीची ठिकाणी ठरली आहेत. या भागातील प्रॉपर्टी ट्रेंडनुसार घरांच्या किमती वाढत असून ‘नाइट फ्रँक’च्या आकडेवारीनुसार जूनमध्ये 5 कोटी ते 20 कोटी या उच्च किमतीच्या घरांची सर्वाधिक नोंदणी मध्य मुंबईत नोंदविण्यात आली आहे.

समुद्राचे सुंदर दृश्य, विमानतळ, रुग्णालय, शाळा या परिसरातून हाकेच्या अंतरावर आहेत, असे रॉकपर्ह्ड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र शाह यांनी सांगितले. व्रेडाई एमसीएचआय, कॉलिअर्स आणि सीआरई मेट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सपोर्ट रिसर्च रिपोर्टच्या मदतीने करण्यात आलेल्या एमएमआर हाऊसिंग अपस्टिक या अहवालानुसार मुंबई शहरात 12,023 घरे विकली गेली आणि मुंबई उपनगरांमध्ये 65,114 घरांची विक्री झाली. मायक्रोमार्पेटच्या महत्त्वाबद्दल सुमित वूड्स लिमिटेडचे संचालक भूषण नेमळेकर म्हणाले, अग्रणी शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि लोअर परळ, वरळी आणि प्रभादेवी या व्यावसायिक केंद्रांपासून हा परिसर खूप जवळ आहे.