हिमाचल प्रदेशात 385 रस्ते बंद

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे तब्बल 385 रस्ते बंद करण्यात आले आहेत. यात दोन राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.