हिमालयीन क्षेत्रातली फुलपाखरे, मधमाशा होताहेत नामशेष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रासयनिक खते, कीटकनाशकांचा अतिवापर आणि ग्लोबल वाॅर्मिंगमुळे हिमालयीन क्षेत्रातील विविध जातीची फुलपाखरे, मधमाशा आणि अन्य उपयोगी कीटकांच्या प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत. मानकाच्या दृष्टीने हि चिंतेची बाब मनाली जात आहे. कारण हे  कीटक आणि फुलपाखरे परागकण वाहून नेत विविध केलीआणि झाडांचे पुनरुत्पादन करीत असतात.अशा अतिशय उपयोगी फुलपाखरांच्या केवळ 60, मधमाशांच्या 51 आणि माशांच्या फक्त 17 प्रजाती हिमालयीन राज्यांमध्ये उरल्या आहेत. शास्त्रज्ञांच्या मते हा बदल निसर्गाच्या चक्रासाठी घटक ठरणारा आहे. शेती आणि कृक्ष प्रजननाच्या कामाला परागकण वाहून नेत मदत करणाऱया या परागणकांचे अस्तित्क राखणे मानवजातीसाठी आवश्यक असल्याचे मत मौहल (कुल्लू) येथील जीबी पंत हिमालयन पर्यावरण संस्थानचे  निदेशक डॉ. राकेश सिंह यांनी व्यक्त केले आहे.