
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीवर काँग्रेस खासदार पवन खेरा यांनी केलेल्या आरोपांवरून भाजप व काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे.
खेरा यांच्या आरोपांबाबत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा अशी मागणी केली. ”पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना करू दे या प्रकरणाचा तपास आम्ही जसा तपास पुढे जाईल जे काही आहे त्याला सामोरे जायला तयार आहोत”, असे खरगे यांनी म्हटले आहे.
खरगे यांच्या या प्रतिक्रीयेवर बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची जीभ घसरली. ‘खरगे यांचं आता वय झालं आहे त्यामुळे ते वेड्यासारखं बडबडतायत. पहिलं तुम्ही लोकांचा अपमान करता आणि नंतर परराष्ट्र मंत्र्यांना त्या आरोपांची चौकशी करायला सांगता. ते काय तुमचे जावई आहेत का? असा सवाल खरगे यांनी केला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.





























































