
अमेरिकेत हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ठरली आहे. हिंदी भाषेनंतर गुजराती आणि तेलगू भाषेचा नंबर लागतो. 1 जुलै 2018 पर्यंत 8.74 लाख लोक अमेरिकेत हिंदी भाषा बोलताना आढळले आहेत. 2017 च्या तुलनेत त्यामध्ये 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2010 नंतर म्हणजे आठ वर्षांत हिंदी भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत 43.5 टक्के वाढ झाली आहे. हिंदी भाषेसह तेलगू भाषा अमेरिकेत सर्वात जास्त बोलली जाणारी दुसरी भाषा ठरली आहे. 2010 ते 2018 दरम्यान तेलगू भाषा बोलणाऱ्या व्यक्तींत 79.5 टक्के वाढ झाली आहे.
‘अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे 2018’ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत 6.73 कोटी निवासी लोक पाच वर्षांपेक्षा जास्त वयाचे असून ते आपल्या घरांमध्ये इंग्रजीशिवाय अन्य भाषा बोलत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेत 21.9 टक्के लोक घरात एक परदेशी भाषा बोलतात.
‘अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे’नुसार अमेरिकेत 20 लाखांहून अधिक हिंदुस्थानी कुटुंबे राहतात. अमेरिकेतील एकूण लोकसंख्येत बंगाली भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण 3.75 लाख आहे.
1 जुलै 2018 पर्यंत तमीळ बोलणाऱ्यांचे प्रमाण 3.08 लाख आहे. त्यामध्ये 67.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
हिंदुस्थानाशिवाय अन्य देशांतील व्यक्तीही बंगाली भाषा अमेरिकेत बोलत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बांगलादेशच्या लोकांचा समावेश आहे. तमीळ बोलणाऱ्यांमध्ये श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशियाच्या नागरिकांचा समावेश आहे.
गुजराती बोलणाऱ्यांची संख्या 4.19 लाख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 3.5 टक्के कमी झाली आहे.
1 जुलै 2018 पर्यंत चार लाख तेलगू भाषिक अमेरिकेत होते.






















































