
वर्धा जिह्याच्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी आरोपी नराधम विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिवत्त सत्र न्यायाधीश राहुल भागवत यांनी गुरुवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर अंकिता ही महाविद्यालयाकडे जात असताना आरोपी विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी अंकिताचा नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार, 10 फेब्रुवारीला मृत्यू झाला. हिंगणघाटच्या वर्दळीच्या चौकातच घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
नराधमाला फाशीच व्हायला हवी होती. आरोपीवर गुन्हा सिद्ध होणे हे आमच्या कुटुंबीयांसाठी तात्पुरते समाधान आहे. ज्यावेळी त्याला फाशीची शिक्षा होईल तेव्हाच आमचे पूर्ण समाधान होईल, अशी प्रतिक्रिया अंकिताच्या वडिलांनी माध्यमांशी बोललाना दिली.


























































