हिंगोलीत एकाच दिवशी 50 कोरोनाबाधित वाढले, रुग्ण संख्या झाली 151

378

हिंगोली जिल्ह्यात 23 मे रोजी सकाळी 6 तर रात्री साडेअकराला आलेल्या अहवालात 44 अशा एकुण 50 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हिंगोलीत आतापर्यंतची एकुण रुग्ण संख्या १५१ असून त्यापैकी ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ६२ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एका आरोग्य अधिकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्तासाठी जाऊन परत आलेल्या हिंगोलीच्या राज्य राखीव दलातील 83 जवान कोरोनाग्रस्त झाल्यामुळे हिंगोलीवासीयांची चिंता वाढली होती. 84 पैकी 82 जवान व अन्य 7 असे 89 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 23 मे रोजी अर्थात शनिवारी एकाच दिवशी ५० रुग्णांची वाढ होऊन कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. शनिवारी सकाळी कोरोनाबाधित आढळलेल्या 6 रुग्णांमध्ये हट्टा येथे आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील तिनजण असुन वसमत येथील दोन जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले. तर औंढा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. यापूर्वीच हिंगोली तालुक्यातील भिरडा, औंढ्यातील पोटा शेळके येथील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व जण मुंबई येथून गावाकडे परतलेले नागरिक आहेत.

शनिवारी रात्री साडेअकरा वाजता 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या १३ जणांचा समावेश आहे. यापैकी मुंबईहून खुडज येथील ९, बरडा येथे दिल्लीहून आलेले ३, गोरेगावच्या विलगीकरण कक्षातील सुरजखेडा गावात मुंबईहून परतलेला एकजण बाधित झाला आहे.

तसेच हिंगोली शहराजवळील लिंबाळा येथील विलगीकरण कक्षातील 31 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात मुंबईहून आलेले 22, चार, संभाजीनगर येथुन आलेले 4 रायगडहून परतलेला एक, कर्नाटकातील बिदरहून आलेला एक, तर भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील दोन व्यक्तीसह एका आरोग्य अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या