हिंगोलीत आमदार मुटकुळेंना भाजपची पुन्हा उमेदवारी

हिंगोलीतून मागील महिनाभरापासून प्रचाराला लागलेले हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उमेदवारीची औपचारीक घोषणा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज १ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक समितीने केली आहे.

३० ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेनिमित्त हिंगोलीत झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तानाजी मुटकुळे यांना पुन्हा भाजपची उमेदवारी देण्याचे सुचक संकेत दिले होते. पक्षांतर्गत स्पर्धाच उरली नसल्यामुळे मुटकुळे यांच्या व्यतिरिक्त भाजपकडे अन्य कुणी प्रबळ दावेदारांनी उमेदवारीची मागणी केली नाही. भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीने महाराष्ट्रातील १२५ उमेदवारांच्या नावाची घोषणा आज १ ऑक्टोबर रोजी केली आहे. त्यामध्ये हिंगोलीतून विद्यमान भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारीची औपचारीक घोषणा झाल्यावर भाजपा कार्यकत्र्यांनी हिंगोलीत फटाके फोडुन जल्लोष केला.

आपली प्रतिक्रिया द्या