शेतकऱ्याने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अकरा हजाराची मदत

1451

कोरोनाच्या आजाराविरुद्ध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न मोठ्या हिमतीने करत आहे. महाराष्ट्र आर्थिक संकटात सापडलेला असताना हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथील दिलीप माधवराव शिंदे या शेतकरी बांधवाने शेतातील हळद विकून अकरा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे.

कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराचा महाविकास आघाडी सरकार व राज्यातील जनता खंबीरपणे उभे राहून महामारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हळद विक्रीतून आलेल्या 11 हजार रुपयांचा धनादेश शेतकरी दिलीप शिंदे यांनी शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोषराव बांगर यांच्याकडे सुपूर्द केला.

हे संकट असूनही ठाकरे सरकार बळीराजाच्या पाठीशी उभे राहिले असून त्याच पद्धतीने सर्व शेतकरी बांधव देखील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या सोबत असल्याचे उद्गार शेतकरी दिलीप शिंदे यांनी काढले. याप्रसंगी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख संतोष बांगर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, राम कदम, माजी पंचायत समिती सभापती कानबाराव गरड, शेतकरी माधवराव सखाराम शिंदे दिलीप माधवराव शिंदे, लिबाजी पठाडे आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या