
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा तापला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. कुठे उपोषण सुरू आहे तर कुठे धरणे आंदोलन. अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली असून त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ ‘वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती’च्या व्यापारी संघटनेने देखील मराठा आरक्षणासाठी आज बंद पुकारला आहे. यापार्श्वभूमीवर सर्व दुकानं बंद असून बाजारपेठेत शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे.
दररोज हजारों लोक या बाजारापेठेत खरेदी विक्रीसाठी येत असतात. लाखो रुपयांची उलाढाल सुरू असते. मात्र आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





























































