
हिंगोलीकरांसाठी सलग दुसरा दिवस शुभवार्ता घेऊन आला असुन आज मंगळवारी अर्थात राज्य राखीव पोलीस दलाच्या 18 जवानांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 53 वर आली आहे. काल 11 मे रोजी हिंगोलीच्या 17 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.
मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्त संपवून हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 मध्ये 194 अधिकारी व कर्मचारी परत आले होते. त्यापैकी हिंगोलीचे 83 व जालना येथील एक अशा 84 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच वसमत येथील दोन, सेनगाव येथील दोन, जालन्याच्या जवानाच्या संपर्कातील 2, जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक परिचारिका देखील कोरोनाबाधित झाली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 91 होती. त्यापैकी काल 11 मेपर्यंत 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर आज मंगळवारी पुन्हा 18 जवानांनी कोरोनावर विजय मिळवल्याने रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात 45 तर संभाजीनगरला 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



























































