हिर्लोक पंचक्रोशीतील गावे कायमस्वरूपी उजळणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिर्लोक पंचक्रोशीतील विजेच्या लपंडावाची समस्या आता कायमची सुटणार आहे. पावसाळ्यात चार चार दिवस अंधारात असलेली ही गावे आता कायमची विजेच्या प्रकाशात उजळणार आहेत. शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर माणगांवहून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लाकला जोडण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या विद्युत वाहिनीमुळे रांगणा तुळसुली, किनळोस, नारूर, गिरगांव व कुसगांव आदी गावांमधला विजेचा लपंडाव संपणार आहे.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक व वेताळबांबर्डे शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून सव्र्हे करण्यात आला. वेताळ-बांबर्डे जिल्हा परिषद मतदार संघातील हिर्लोक पंचक्रोशीमध्ये रांगणा तुळसुली, किनलोस, हिर्लोक, नारूर, गिरगाव, कुसगाव या गावांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या कडावल येथून डिगसमधून येत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. ग्रामस्थांनी