दारू पिऊन दुचाकी चालकाची रिक्षाला धडक, जाब विचारल्यावर पिस्तूल दाखवून मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

पुण्यात मद्यपान करून सराईत गुन्हेगाराने दुचाकी चालवित रिक्षाला धडक दिली. त्यामुळे जाब विचारणार्‍या चालकाला थेट पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिससांनी आरोपीसह दोघांना उत्तमनगर अटक केली आहे.

सोमवारी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोंढवे धावडे येथील पेट्रोलपंपावर रिक्षाचालक इंधन भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाठीमागून नशेत दुचाकी चालवित आलेल्या संदीप आणि स्वरूपने रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रिक्षाचालकाने त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे सराईत संदीपने पिस्तूल काढून रिक्षाचालकावर रोखले. त्यानंतर रिक्षाचालक निघून जात असताना, आरोपींनी त्यांचा पाठलाग करून गेले जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी संदीप सावंत आणि स्वरूप आवटे या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतुस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक यु.डी. रोकडे तपास करीत आहेत.