श्रीवर्धनमध्ये हिट अँड रन; पुण्याच्या पर्यटकाच्या थार गाडीने मोटारसायकलस्वार ठार

श्रीवर्धन तालुक्यात हिट अँड रनची गंभीर घटना घडली आहे. पुण्याहून आलेल्या पर्यटकाच्या थार गाडीने एका मोटारसायकलस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव परवेज हमदुल्ले (रा. श्रीवर्धन) असे आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. अपघाताची नेमकी कारणे आणि थार गाडी चालवणारा नेमका कोण होता, याचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून पुढील कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.