
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या हिताशी बक्षी हिने उल्लेखनीय कामगिरी करून हाँगकाँग ज्युनियर गोल्फ स्पर्धेच्या (१४ वर्षांखालील) जेतेपदावर दिमाखात मोहोर उमटवली. तसेच कार्तिक शर्माने १५ वर्षांखालील स्पर्धेत दुसरा आणि सुनीत बिश्नोई याने १७ वर्षांखालील स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा डिस्कवरी बे गोल्फ क्लब येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आठ देशांतील ६० ज्युनियर गोल्फपटूंनी सहभाग घेतला. विजयानंतर हिताशी बक्षी म्हणाली, डीएलएफ गोल्फ ऍकॅडमीच्या प्रशिक्षक व स्टाफ यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे खेळामध्ये सुधारणा करता आली. आता आणखी काही तांत्रिक बाबींवर लक्ष द्यायचे असून भविष्यात चमकदार खेळ करावयाचा आहे.


























































