कोरोनाशी लढताना चुका झाल्या पण विरोधी पक्षांनीही काय कामगिरी केली? अमित शहांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटकाळात भाजपने वर्च्युअल रॅलीची सुरूवात केली आहे. सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी ओडिशामध्ये एका रॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी राम मंदिर, सर्जिकल स्ट्राईक सारख्या मुद्द्यांना हात घातला. कोरोना संकट काळात केंद्र सरकारच्या काही चुका झाल्या असतील अशी कबुली त्यांनी दिली. पण विरोधी पक्षांनीही काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

माजी भाजपध्यक्ष अमित शहा म्हणाले की कोरोनाशी लढताना आमच्याही काही चुका झाल्या असतील. परंतु विरोधी पक्षांनी तरी काय केले?  कोणी स्वीडन, अमेरिकेतील लोकांशी चर्चा करत होते. याशिवाय आपण केले काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित 1.70 लाख कोटी गरजू लोकांना दिले. या काळात ओडिशाचे लोक अनेक भागातून आपल्या घरी पोहोचले. त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी श्रमिक ट्रेन सोडल्या असे शहा म्हणाले.


बिहारपासून भाजपने या व्हर्च्युअल रॅलींना सुरूवात केली. बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहतील असे त्यांनी जाहीर केले. भाजप आगामी काळात एकूण 75 व्हर्च्युअल रॅली करणार आहे.