युरिक ऍसिडवर घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आहारात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास शरीरात युरिक ऑसिड वाढते. यामुळे सांधेदुखी, संधीवात यासारखे विकार होतात. हा आजार साधारण तिशीनंतर सुरू होण्याची शक्यता. यासाठी त्याची कारणे आणि घरगुती उपचार माहीत असणे आवश्यक आहे. 

  • अतिरिक्त औषधे घेणे, आवश्यकतेपेक्षा जास्त प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असणे शिवाय व्यायाम, शारीरिक श्रमाची कमतरता यामुळे शरीरात युरिक ऑसिड वाढू शकते.
  • अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ऑसिड, जीवनसत्त्व, मिनरल्स, कॅल्शियम, प्रोटिन, आयर्न असते. जे आरोग्यासाठी चांगले असतात. रोज सकाळी रिकाम्यापोटी 2-3 अक्रोड खाल्ल्यामुळे युरिक ऑसिड नियंत्रणात राहते.
  • युरिक ऑसिड वाढले की शरीरात लवकर पसरते आणि गाठी होतात. अशावेळी एक चमचा बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यात मिसळून घ्या. यामुळे शरीरातील गाठी विरघळण्यास मदत होते. शिवाय युरिक ऑसिडचे प्रमाणही कमी होते.
  • हातपाय धरणे, सांधेदुखी, अवयव सुजणे, उठण्या-बसण्यास त्रास होणे हे आजार शरीरात युरिक ऑसिड वाढल्यामुळे होतात.
  • एक चमचा मधात अश्वगंधा पावडर मिसळा. हे मिश्रण दुधासोबत घ्या. उन्हाळ्यात किंवा गरम वातावरणात हे औषध कमीत कमी सेवन करा.
  • जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेले युरिक ऑसिड युरिनवाटे शरीराबाहेर निघून जाते. ऊर्जाही टिकून राहते.
  • दररोज जेवणामध्ये ओव्याचा वापर केल्यास युरिक ऑसिडचे प्रमाण कमी होते.
  • शरीरात मेदाचे प्रमाण वाढले की, वजन वाढते. यामुळे युरिक ऑसिड वाढण्याची शक्यता जास्त असते.
  • युरिक ऑसिडचे शरीरातील प्रमाण कमी करण्यासाठी बेकरी प्रोडक्ट, रेडी टू सर्व्ह, अति मांसाहार टाळावा.
  • दररोज बीट, सफरचंद आणि गाजराचा रस प्यावा. यामुळे शरीराचा पीएच स्तर वाढतो आणि युरिक ऑसिड नियंत्रणात राहते.