हे तर गुप्तचर संस्था आणि गृहमंत्रालयाचे अपयश, रजनीकांत यांचा हल्लाबोल

895

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन हिंसक झाले आणि यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण अद्यापही गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढतच आहे. या हिंसाचारावर आता दाक्षिणात्य अभिनेता, सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली असून हे गुप्तचर संस्था आणि गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

Delhi Violence – अजित डोवाल उतरले मैदानात, हिंसाचारग्रस्त भागाची केली पाहणी

दिल्लीतील हिंसाचार एवढा भडकला हे गुप्तचर संस्था आणि गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी दिली आहे. एखाद्या गोष्टीचा विरोध शांततेत होऊ शकतो, हिंसाचार हा पर्याच नाही, असेही ते म्हणाले.

दिल्लीतील ईशान्य भागामध्ये गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार उफळला आहे. दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असला तरी सलग चौथ्या दिवशीही काही भागांमध्ये हिंसाचार झाला. अनेक भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. सीबीएसईच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसजी अजित डोवाल यांनी हिंसाचार रोखण्यासाठी दिल्लीतील दंगाग्रस्त भागांचा दौरा केला आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. यानंतर याचा अहवाल गृहमंत्रालयाकडे देण्यात आला असून आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

गैरसमज बाळगू नका, तो कसा दूर करायचा हे चांगलं माहितीय! योगींचा दंगेखोरांना इशारा

दिल्ली पोलिसांनीही हिंसाचार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली असून ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरोधात शूट अॅट साईटचे आदेश दिले. तसेच आतापर्यंत 18 एपआयआर दाखल केल्या असून 100 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती बुधवारी दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दिली.

आपली प्रतिक्रिया द्या