
ब्रिटनच्या ओल्डबरी शहरात एका हिंदुस्थानी महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघांनी केवळ बलात्कार केला नाही, तर आरोपींनी पीडित महिलेला म्हटले की, तू तुझ्या देशात परत जा. त्यामुळे ही घटना बलात्कार आणि भेदभाव करणारीसुद्धा आहे. पीडित महिला 20 वर्षीय असून तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पुरुष हे गोऱया रंगाचे होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.