संभाजीनगरात दोन घोड्यांना ग्लँडरची लागण, दया मरण देण्याचा निर्णय

844

संभाजीनगर शहरातील कोकणवाडी भागात घोड्यांच्या तबेल्यातील दोन घोड्यांना ग्लँडर आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन घोड्यांना दया मरण देण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला.

कोकणवाडी भागात जनार्धन तांबे यांचा घोड्याचा तबेला आहे. हे घोडे लग्न समारंभासाठी भाड्याने दिले जातात. या तबेल्यातील दोन घोड्यांना ग्लँडर या जिवाणूजन्य आजाराची लागण झाली असून हा आजार संसर्गजन्य आहे. या घोड्यांची तपासणी पशुसंवर्धन विभागाच्या डाँक्टरांनी केली. त्यामध्ये हा गंभीर आजार असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डाँ. प्रशांत चौधरी, सहायक आयुक्त डाँ. डी एस कांबळे, वल्लभ जोशी, डाँ. राठोडकर, मनपाचे पशुसंवर्धन संचालक डाँ. बी. एस. नाईकवाडे यांची बैठक झाली. या बैठकीत दोन घोड्यांना दया मरण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या