गोरेगावमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, पालिकेच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत नोकरी करणार्‍या आणि राहण्याची व्यवस्था नसणार्‍या महिलांसाठी पालिका गोरेगावमध्ये वसतिगृह बांधणार आहे. या 16 मजली वसतिगृहात पाळणाघर, वाचनालय, भोजनगृह अशा सुविधा असणार आहेत. या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला आज स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. 74 खोल्यांच्या या इमारतीसाठी एकूण 28 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या महिला-मुली कमी घरभाडे आणि सुरक्षित घराच्या शोधात असतात, पण सुरक्षेच्या हमीसाठी काहींना दामदुप्पट घरभाडे मोजाके लागते तर काही केळा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अशा महिलांसाठी बहुउद्देशीय गृहनिर्माण इमारत बांधण्याचे आरक्षण विकास नियोजन आराखडा 2034 मध्ये ठेकले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीपासूनच वसतिगृहाच्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे. यासाठी सन 2019-2020 या आर्थिक वर्षात पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

असे होणार वसतिगृह

  • ही इमारत बहुउद्देशी असणार आहे. या वसतिगृहात 74 खोल्यांमध्ये एकूण 181 खाटांची सोय करण्यात येणार आहे.
  • गोरेगाव पश्चिम पहाडी गाव येथे68 चौ.मी. जागेत वसतिगृहाचे बांधकाम होणार.
  • चौथा ते सहावा, आठवा ते 13 आणि 15 क 16 या मजल्यांवर प्रत्येकी आठ खोल्या व 15 खाटांसह.
  • तर सातव्या आणि 14 व्या मजल्याकर प्रत्येकी चार खोल्या आठ खाटांसह असतील.