अक्षयच्या कानात फूल… ‘हाऊसफूल-4’चा फोटो पाहून होईल बत्ती गूल

1043

दिवाळीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चीत ‘हाऊसफूल-4’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या स्टारकास्ट व्यस्त आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाचे प्रमोशन जोमाने सुरू आहे. चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर आणि सुमधूर गाण्यांमुळे प्रेक्षकांची उत्कुतचा शिगेला पोहोचली आहे.

‘हाऊसफूल-4’ या चित्रपटातील कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असून काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याने रितेश देशमुखला रस्त्यावर उभा राहून डान्स करण्याचे आव्हान दिले होते. रितेश हे आव्हान स्वीकारत रस्त्यावर फक्त डान्सच केला नाही तर त्याचा व्हिडीओही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

आता अभिनेता अक्षय कुमार यांनी ‘हाऊसफूल-4’ चित्रपटातील टीमचा एक मजेशीर फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘हाऊसफूल ऑफ फूल्स’ असे कॅप्शन दिले आहे. फोटोमध्ये चित्रपटातील तिन्ही अभिनेत्री रितेश आणि अक्षयसोबत कानात फूल घालून उभ्या असल्याचे दिसत आहे. याला समर्पक असेच कॅप्शन अक्षयने दिले आहे.

दरम्यान, 26 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती सेनन, कृती खरबंदा, पूजा हेगडे, राणा दग्गुबाती, बोमन इरानी आणि नवाझुद्दीने सिद्दीकी अशी तगडी स्टारकास्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या