
हाऊसिंग सोसायटय़ांमध्ये सभासदत्व मिळवताना नागरिकांना अडचणी येतात. काही वेळा कमिटी अर्ज स्वीकारण्यास नकार देते किंवा अनावश्यक विलंब करतात.
असे झाले तर अर्जदाराला महाराष्ट्र सहकार कायदामधील कलम 23(1)(अ) अंतर्गत उप/सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचा अधिकार आहे.
सोसायटीच्या व्यवस्थापन कमिटीने नियमांचे पालन केले नाही तर कलम 79(3), 73ई आणि 78 अंतर्गत निबंधक संबंधित व्यवस्थापन समितीवर कारवाई करू शकतात
अर्जदाराने सहकार नियमांनुसार नमुना ‘एच (1)’ (नियम 19 ए) मध्ये सर्व माहिती भरून अर्ज उप/सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावा लागतो.
उप/सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत अर्ज संस्थेकडे पोहोचल्यानंतर संस्थेला 60 दिवसांच्या आत सभासदत्वाबाबत निर्णय घेऊन अर्जदाराला कळवणे बंधनकारक आहे.


























































