
बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार हक्क यात्रेचा 10 वा दिवस उत्साहपूर्ण झाला. ही यात्रा सुपौल जिल्ह्यातून मधुबनीपर्यंत पोहोचली असता, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभेत उपस्थितांना संबोधित करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
मधुबनी येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या ‘भाजपची सरकार 40-50 वर्षे टिकेल’ या विधानावरून टीका केली. ते म्हणाले, “अमित शहा यांना सरकार किती वर्षे टिकेल हे कसं माहीत? हे विधान ऐकताना आधी विचित्र वाटलं, पण आता सत्य समोर आलं आहे. ते असं म्हणू शकतात कारण हे लोक मतचोरी करतात.”
राहुल गांधी म्हणालं की, यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये लहान मुलांपर्यंत ‘मोदी वोट चोर आहे’ असा जागर होतोय. मुलं माझ्या कानात येऊन हे सांगतात, पण माध्यमांना हे समजतच नाही,” असं ते म्हणाले. राहुल गांधींनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करत म्हटलं की, ही यात्रा मतदारांच्या हक्कांसाठी आहे आणि यात प्रत्येकाने भाग घ्यावा.