‘गूगल मॅप’ला लाईव्ह ट्रॅफिकची माहिती कशी कळते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवासादरम्यान आता रस्ता माहीत नसल्यामुळे इच्छित स्थळी पोहचण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली जाते. गुगल मॅपमुळे अनेकांची अडचण दूर झाली आहे. काही वेळेस गुगल मॅपकडून शॉर्टकटचा रस्ता दाखवण्यात येतो. तसेच गुगल मॅपमुळे आपल्या लाईव्ह ट्रॅफिकबद्दलही माहिती मिळते. मात्र गुगलला लाईव्ह ट्रॅफिकची माहिती कशी मिळते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण याचेच उत्तर जाणून घेणार आहोत.

लाईव्ह ट्रॅफिकची माहिती मिळवण्यासाठी Google ने सर्व चौकांवर डिव्हाईस स्थापित केले आहे का? असे अनेकांना वाटते. मात्र हे मुळीच शक्य नाही. तसे झाले असते तर, चौका व्यतिरिक्त रस्त्यावरील इतर ठिकाणची माहिती आपल्याला मिळाली नसती. आता तुम्ही म्हणाल की, मग ही माहिती उपग्रहाच्या मदतीने दिली जात असेल. परंतु हे देखील शक्य नाही.

गुगलला लाईव्ह ट्रॅफिकची माहिती मिळवून देण्यासाठी आपल्या मोबाईलचीच मदत घ्यावी लागते. हो तुमच्या मोबाईल मधूनच लाईव्ह ट्रॅफिकची माहिती मिळते. कारण गुगल Android आणि iOS युजर्सचे लोकेशन ट्रेस करत असते. त्याच्याच मदतीने गुगलला ट्राफिकची माहिती मिळते. गुगलला ज्या रस्त्यावरअधिक मोबाईल युजर्सची संख्या दिसते. तेथेच गुगल ट्रॅफिक जॅम दाखवतो. त्यामुळे युजर्सला ट्राफिक जॅमचे नोटिफिकेशन दिसते. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली.