
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमती, पुरवठा आणि संभाव्य तुटवडा याबाबत अफवा मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या परिस्थितीत केंद्र सरकारने शुक्रवारी (27 मार्च 2026) महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे.
सरकारने स्पष्टपणे सांगितले की देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन महिन्यांसाठी इंधनाचा पुरेसा साठा आणि पुरवठा व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली असल्याचेही सरकारने नमूद केले आहे.
सरकारच्या या विधानामुळे पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर पडदा पडण्याची शक्यता आहे. तसेच नागरिकांनी घाबरून इंधन साठवून ठेवण्याऐवजी नियमित गरजेनुसारच वापर करावा, असेही अप्रत्यक्षपणे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत असताना, देशात इंधनाच्या पुरवठ्याबाबत सरकारने दिलासा देणारी भूमिका घेतली आहे.




























































