कंडिशनर केसांना कितपत चांगला..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केस शँपूने धुतल्यानंतर कंडिशनर लावण्याचा सल्ला प्रत्येकजण देत असतो. आपण नेहमी कंडिशनर वापरतोदेखील. पण अनेकदा कंडिशनरचे नक्की प्रमाण न समजता अधिक वापरण्यात येतो. जास्त कंडिशनर वापरल्याने केस अधिक चमकदार होतात असा अनेकांचा गैरसमज असतो. पण असे अजिबात नाही. कारण अतिवापर हा नेहमीच नुकसान करतो हे तुम्ही ऐकलंच आहे. मग त्याला कंडिशनर अपवाद कसा ठरेल?

​केसांना किती प्रमाणात कंडिशनर लावावे?​
सर्वात पहिले तुम्हाला हे जाणून घेतले पाहिजे की, केसांच्या उंचीनुसार कंडिशनर लावायला हवा आणि केस जितके जास्त ओले असतील तितका कंडिशनर कमी लागेल. तसंच केसांना एकदम कमी कंडिशनरदेखील लाऊ नये. जेव्हा केस कव्हर होत आहेत असं तुम्हाला जाणवेल, तेव्हा त्यावर कंडिशनर लादू नये. संपूर्ण केसांना योग्य कंडिशनर लावले असल्याचे समजल्यावर अधिक वापर करू नये.

​कंडिशनर जास्त लागले आहे हे कसे समजावे?​
कंडिशनर लावताना जेव्हा हातामध्ये अधिक कंडिशनर दिसून येईल अथवा केस धुताना अधिक चिकट जाणवत असेल तर कंडिशनर जास्त लावल्याचे समजावे. मात्र संपूर्ण कंडिशनर केसातून जाईपर्यंत तुम्हाला केस धुणे गरजेचे आहे.

​जास्त कंडिशनर लावल्याने काय होते?​
केसांचा बाऊन्स गायब होतो आणि केस चिकट दिसू लागतात
केसांची कोणतीही स्टाईल यामुळे तुम्ही करू शकत नाही
फारच कमी वेळात केस पुन्हा धुण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटू लागेल इतके केस खराब दिसतात

​केसांना कसे लावावे कंडिशनर?​
केस ओले असतानाच केसांना कंडिशनर लावावे. कोरड्या केसांवर कंडिशनरचा काहीही उपयोग होणार नाही. ओल्या केसांना कंडिशनर लावल्यावर बोटांनी व्यवस्थित केसांवर पसरवा अथवा कंडिशनर लावल्यानंतर फणीचा वापर करा. यानंतर साधारण ५ मिनिट्स केसांवर तसंच राहू द्या आणि मगच केस धुवा. यामुळे केसांना चांगली चमक येते.

कोणते कंडिशनर वापरावे?
अमोनिआ फ्री कंडिशनरचा वापर करावा. तसंच हर्बल कंडिशनर असेल तर उत्तम

आठवड्यातून किती वेळा कंडिशनर लावावे?
आठवड्यातून किमान दोन वेळा कंडिशनर लावणे गरजेचे आहे. केसातील धूळ – माती काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो.

स्काल्पला कंडिशनर लागले तर नुकसान होते का?
सहसा स्काल्पला कंडिशनर लावू नये. यामुळे स्काल्प कोरडा होण्याची आणि कोंडा होण्याची शक्यता निर्माण होते.